सावधान… वणी परिसरात दुचाकी चोरटे पुन्हा ऍक्टिव्ह

रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली

विवेक तोटेवार, वणी: शेतात जाताना रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घडली. सकाळी दुचाकी मालक विजय नानाजी टोंगे (40, रा. नांदेपेरा) हे त्यांच्या दुचाकीने शेतात जात होते. शेताजवळ पोहोचल्यावर त्यांनी नांदेपेरा-वनोजा देवी मार्गावर कडेला आपली दुचाकी (MH29 BG9301) उभी ठेवली. शेतातील काम संपवून ते परत आल्यावर त्यांना दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी त्यांच्या दुचाकीचा दोन दिवस शोध घेतला. मात्र त्यांना दुचाकी मिळाली नाही. विजय यांनी वणी ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 303 (2) बी एन एस नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा तपास नापोका अविनाश बनकर करीत आहे.

Podar School 2025

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

Comments are closed.