मुकुटबन परिसरात चोरीच्या डिजलच्या विक्रीला ऊत

कंपनीतल्या डिजलची खासगी वाहन चालकांना विक्री

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व लोकसंख्येने मोठे असलेले गाव म्हणून मुकुटबन या गावाची ओळख आहे. परिसरात अडेगाव, गणेशपूर व लहान पांढरकवडा परिसरात डोलोमाईट, चुना फॅक्ट्री, कोळसा खाण असून मुकुटबन येथे सिमेंट फॅक्ट्रीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे वरील कंपनी व फॅक्ट्री मध्ये मोठ्या चारचाकी वाहनांची वर्दळ आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांच्या करीता सुद्धा खासगी वाहने मोठ्या प्रमाणात आहे. ज्यामुळे लेबर आणणे, कोळसा वाहतूक, चुना वाहतूक व डोलोमाईट वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

कंपनीत सुरू असलेल्या खाजगी वाहने, जेसीबी करीता डिजल येते. परंतु एका कंपनीत जेसीबी व अधिकाऱ्यांच्या गाड्याकरिता डिजल वरिष्ठ स्थळावरून टँकरने पाठविला जातो. परंतु टँकर मधील डिजल कंपनीतील काही अधिकारी यांना हाताशी धरून टँकर मधील शेकडो लिटर डिजल गावातील व बाहेर गावातील संथाचालक, ट्रॅक्टर मालक, धनाढ्य चारचाकी मालक, दुकानदार, कालिपिली व ऑटो चालक, खाजगी शाळा मालक अशा लोकांना पकडून या लोकांना बाजार भावापेक्षा कमी दरात शेकडो लिटर विकून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

खासगी कंपनीत डिजल भरून टँकर घेऊन येणारा व्यक्तीने मुकुटबनसह, गणेशपूर, पुरड, कायर, मांगली व इतर गावतील ठराविक लोकांना आपल्या हाताशी धरून त्या लोकांना टाकी प्रमाणे डिजल विक्री करत आहे. तर रुईकोट येथील एका व्यक्तीच्या घरी दररोज ८ ते १० टाकी डिजल उतरविले जात असून तेथूनही डीझलची विक्री सुरू आहे. कंपनीत डिजल भरून येणारा टँकर एका पंपावर सुद्धा येत असून तिथेही डिजल खाली केल्या जात असल्याची माहिती आहे. सदर डिजल चोरी करून कुठून आणले जाते? कंपनीचे आहे की इतर कुठून आणून विकले जाते? हे कोडे आहे.

चोरीचा डिजल विकणाऱ्यात वरील गावातील तरुण युवक असून रात्री बेरात्री कोळशाच्या ट्रकचालक व खाजगी वाहन धारकांना विक्री करताना दिसत आहे. आज तरुण युवक चोरीचे डिजल विक्री करीत आहे तर उद्या स्वतः चोरी करणार अशी परिस्थिती निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहे. डिजल चोरीचा शोध घेणे पोलिसांसमोर एक मोठे आवाहन असून सदर डिजल चोरास त्वरित पकडून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.