शहरातील सुप्रसिद्ध कलाकार उमेश रासेकर यांच्या टॅट्यू स्टुडिओचे थाटात उद्घाटन

आता वणीतच काढून मिळणार आर्टिस्टिक व कस्टमाईज टॅट्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सुप्रसिद्ध चित्रकार व फाईन आर्टिस्ट उमेश रासेकर यांनी आता टॅट्यू मेकिंग या क्षेत्रात पाऊल टाकले असून विठ्ठलवाडी येथे त्यांच्या उमेश रासेकर्स या नावाने टॅटू स्टुडिओचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. विदर्भातील सुप्रसिद्ध टॅट्यू आर्टिस्ट टॅन्जो लामा यांच्या हस्ते या स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भंडारा येथील टॅट्यू आर्टिस्ट रितेश सावंत यांनी प्रमुख उपस्थिती होती.

सदर स्टुडिओमध्ये रियल्रॅस्टिक टॅट्यू (चेहरा, पोर्टेट, फेस), ट्रॅडिशनल टॅट्यू (नाव, स्मृतीस्थळ, विविध डिझाईन) मॉडर्न आर्ट टॅट्यू, कस्टमाईज टॅट्यू (ग्राहकांच्या आवडीनुसार), कलरचे टॅट्यू काढूण मिळणार आहे. याशिवाय जुने टॅट्यू पुसुन त्यावर नवीन टॅट्यू काढण्याची सुविधा देखील या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहे. एकदा स्टुडिओला अवश्य भेट द्यावी असे आवाहन उमेश रासेकर यांनी केली आहे.

गुरुंना दिली अनोखी भेट
उमेश यांची परिसरात एक चित्रकार व फाईन आर्टिस्ट म्हणून ओळख आहे. टॅट्यू मेकिंग हा एक फाईन आर्टचाच प्रकार असला तरी यात अनेक तांत्रिक बाबी आहेत. त्यामुळे त्यांनी विदर्भातील सुप्रसिद्ध टॅट्यूआर्टिस्ट टॅन्जो लामा यांच्याकडून शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. टॅट्यू स्टु़डिओच्या लोगोमध्ये त्यांनी आपले गुरु टॅन्जो यांचा चेहरा वापरत एक प्रकारे त्यांना गुरुदक्षिणाच दिली आहे. या लोगोचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे.

उमेशने अल्पावधीतच शहरातील कला शेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कॅनवॉस पेन्टींग, मूर्तीकला, चित्रकला यासह सेट डिझायनिंगमध्ये त्यांनी विविध प्रयोग केले आहे. गेल्या वर्षी नवरात्री उत्सवात त्यांनी साकारलेल्या देवीचे देखाव्यांची चांगलेच कौतुक झाले होते. आता टॅट्यू मेकिंग क्षेत्रातही तो आपली वेगळी छाप सोडणार हे नक्की.

हे देखील वाचा:

स्पर्धेला घाबरला तो, तरीही जिंकला लढाई….

Comments are closed.