…अन् दुचाकीचे झाले दोन तुकडे, वनोजादेवीजवळ भीषण अपघात

मच्छिंद्रा येथील एक जागीच ठार, ट्रकने धडक दिल्याचा अंदाज

भास्कर राऊत, मारेगाव: वनोजादेवी ते मच्छिंद्रा रोडवरील वाघाडा पुलाजवळ एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात दिनेश गजानन मत्ते (वय 48) रा. मच्छिंद्रा यांचा जागीच मृत्यू झाला. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीमुसार, दिनेश हे (MH29 x2985) या पल्सर कंपनीच्या दुचाकीने गावातील एकाला घेऊन वणीला गेले होते. परत येताना ते एकटेच वणीहून निघाले. दरम्यान वनोजा देवीजवळ एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की यात दुचाकीचे दोन तुकडे झाले. या अपघातात दिनेश यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या दुचाकीजवळ एक ट्रक उभा होता. त्यामुळे या ट्रकनेच धडक दिली असावी असा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे. वृत्त लिहिपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या घटनेचा पंचनामा सुरू आहे. मृतक दिनेशच्या पश्चात आईवडील, पत्नी, एक 13 व एक 11 वर्षीय मुलगी असा आप्तपरिवार आहे. (अधिक माहिती येताच बातमी अपडेट करण्यात येईल.)

Comments are closed.