विद्यापीठाच्या निवडणुकीत प्रा. डॉ. संतोष डाखरे यांचा विजय

स्तभलेखक, आंतराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून डॉ. डाखरे यांची ओळख

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्यावतीने विविध प्राधिकरणाकरिता नुकत्याच निवडणुका पार पडल्यात. यामध्ये राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत मुळचे मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील रहिवासी असलेले प्रा. डॉ. संतोष डाखरे हे बहुमताने विजयी झालेत. डॉ. डाखरे हे गडचिरोली जिल्यातील राजे विश्वेश्वरराव कला- वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणुन कार्यरत आहेत.

डॉ. संतोष डाखरे हे स्तंभलेखक तथा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून परिचित असून विविध वृत्तपत्रातून ते राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयावर सातत्याने लिखाण करीत असतात. मागील वर्षी त्यांचे कोरोना कालावधीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करणारे लक्षवेध नामक पुस्तकाचे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाताई आमटे यांच्याहस्ते प्रकाशित झाले होते.

राज्यशास्त्र विषयाला न्याय देणार – डॉ. डाखरे
विजयासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे आभार. पुढील पाच वर्ष अभ्यास मंडळाच्या माध्यमातून राज्यशास्त्र विषयाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार.
– डॉ. संतोष डाखरे

Comments are closed.