विवाहितेची कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या

सततच्या आत्महत्येमुळे मारेगाव तालुका हादरला

भास्कर राऊत, मारेगाव : दरदिवशी घडत असलेल्या आत्महत्येच्या घटनांमुळे मारेगाव तालुका पुरता हादरला आहे. मागील दहा दिवसात तब्बल 8 जणांनी विविध कारणास्तव आपली जीवनयात्रा संपविली. गुरुवारी तालुक्यातील इंदिराग्राम येथे एका 29 वर्षीय विवाहित महिलेनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. मीराबाई राजू आत्राम असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार इंदिराग्राम येथील मीराबाई आत्राम आपल्या कुटुंबासह शेती व मोलमजूरी करून उदरनिर्वाह करीत होती. मीराच्या घरची मंडळी नेहमीप्रमाणे शेतामध्ये कामावर गेली असून ती घरी एकटीच होती. सकाळी 8 वाजता दरम्यान मीराचा चुलत भाऊ तिच्या गरी गेला असता त्याला मीराच्या तोंडात फेस येऊन खाली पडलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी लगेच याबाबत घरच्या लोकाना माहिती दिली. कुटुंबियानी मीराला तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

ऐन आयुष्याच्या उमेदीत मीराने केलेली आत्महत्या ही समाजमनाला चटका लावून जाणारी आहे. तालुक्यामध्ये आधीच आत्महत्याची संख्या वाढत आहे. शेतकरी आत्महत्या तर नित्याची बाब झालेली आहे. अशातच आपल्या लहान मुलांना वाऱ्यावर सोडून मीराने केलेल्या आत्महत्यामुळे हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मृतक मीरा यांच्यामागे पती, एक मुलगा व एक मुलगी आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.