सुशील ओझा, झरी: बाहेरगावाहून किराणा व भाजीपाला आणण्यासाठी प्रशासनातर्फे संचार परवाना देण्यात आला आहे. या पासचा वापर गुटखा आणि सुगंधी तंबाखू आणण्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मांगली व मुकूटबन येथील काही गुटखा तस्कर या पासचा दुरुपयोग करीत असल्याची चर्चा सुरू आहे.
शासनाच्या आदेशाने पानटपरी बंद करण्यात आले परंतु पानटपरी चालक घरून खर्रा विक्री करीत आहे. तर खिशात भरून घरपोचही खर्याची विक्री २० रुपया पासून तर ४० रुपयांपर्यंत सुरू आहे. या प्रमाणे १७०० ते १८०० रुपये प्रमाणे काही दुकानदार विक्री करत आहे. यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
वणी येथून दोन मोठे गुटखा तस्कर असून ते मुकुटबन मांगली कायर झरी येथील दुकानदारांना विकत देतो. कधी आपल्या चारचाकीने पाठवतो तर कधी पांढऱ्या कलरच्या आलिशान गाडीत नाहीतर चारचाकी हत्ती या गाडीतून वणी वरून दुकानदार सुग्नधित गुटखा तालुक्यात आणून विक्री करीत असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी अत्यावश्यक वास्तुकरिता दिलेल्या पासचा गैरफायदा घेणाऱ्या दुकानदाराचा शोध घेऊन त्याच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी आता होत आहे.