सुशील ओझा, झरी: तालुक्यातील लिंगटी येथे सोमवारी दिनांक 24 मे रोजी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. पहिल्या दिवशी आरोग्य विभाकडून 70 लास पुरविण्यात आली. लिंगटी ग्रामवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसात देत लस घेण्यात पुढाकार घेतला.
पहिल्या दिवसात आलेले 70 डोजेस संपले. लसीकरण सुरू असताना वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची आकस्मक भेट झाली व त्यांनी सदर मोहिमेचे स्वागत करत आरोग्य विभाग व ग्रामपंचायतचे आभार मानून चांगला उपक्रम राबवित असल्याची प्रतिक्रिया दिली. याशिवाय तालुक्यातील समस्त जनतेनी लसीकरनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा केले.
लसिकरणाला आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहन गेडाम , एस.एस. सूर्यवंशी, कमल मडावी, मनीषा कांबळे, रुचिता तोडसाम, वैशाली वाघेकर, नानीबाई कुमरे, रेणुका घोडाम, सुलताना शेख, सुभद्रा घोडाम, अजय मडावी यांनी आपली सेवा प्रधान केली.
मोहीमेला यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील नारायणरेड्डी याल्लावार, अशोक रेड्डी बोदकुरवार, भुमरेड्डी पाटकुरवार, जितेन्द्र बोदकुरवार, सभोज बद्दमवार, अमोल धिडसे, गणेश गोर्लेवार यांनी पुढाकार घेऊन या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा: