व्याख्यात्या अॅड. वैशाली डोळस यांच्या हस्ते प्रियल पथाडे यांचा सत्कार

0

झरी,बहुगुणी डेस्क: संविधान दिनानिमित्त आदर्श हायस्कूल मुकूटबनच्या प्रांगणात भारतीय बौद्ध महासभा व संभाजी ब्रिगेड झरी तर्फे आयोजित केलेल्या जाहीर व्याख्याना दरम्यान प्रियल पथाडे या युवकाचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार व्याख्यात्या अॅड. वैशाली डोळस यांच्या हस्ते करण्यात आला.

आजचे युग हे सोशल मीडियाचे आहे. परंतु सोशल मिडीयाचा वापर जेवढा अयोग्य केला जातो तेवढ्याच प्रकारे योग्यरीत्या केल्यास स्वत:ला व समाजाला नक्कीच फायदा होतो. अशाच प्रकारे प्रियलने सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून गरजू गरीब रूग्णांना मदत केली व करत आहे.

आजच्या युगात सोशल मीडियाचा योग्य वापर करून अशाप्रकारचे कार्य प्रियल व त्याचे सहकारी रक्तवीर बहुउद्देशीय संस्था हे करीत आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या सर्व युवकांसाठी प्रियलचे कार्य नक्कीच मार्गदर्शनपर आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.