निकेश जिलठे, वणी: वणी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात प्रचाराचा ज्वर चढला आहे. वणी विधानसभा मतदार संघामध्ये चौरंगी लढत होणार अशी चर्चा असताना आता वंचित बहुजन आघाडीनेही प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे. एकीकडे उमेदवार हायटेक प्रचारतंत्र अवलंबवत असले तरी वंचितचे उमेदवार राजेंद्र निमसटकर यांनी पारंपरिक प्रचारतंत्राचा वापर करीत प्रचार सुरु ठेवला आहे. त्यांनी डोअर टू डोअर प्रचार व कॉर्नर सभांचा धडाका लावला आहे. त्याला खेड्यापाड्यात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
कॉर्नर सभेत मतदारांना संबोधताना राजेंद्र निमसटकर म्हणाले की आजतागायत इथल्या भांडवलवादी यंत्रणानी सामान्य लोकांच्या मताचा वापर करुन आपल्या सात पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती कमावली आहे. जनतेला दारिद्रयाच्या खाईत लोटलं. दिंवसेंदिवस जनता गरीब होतं चाललेली आहे. एकेकाळचा मध्यमवर्गीय, श्रीमंत असलेले कुटुंब आज गरीबीच्या लाइनीत येत आहेत. मागासवर्गीय जनतेला गुलाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. गावखेड्यातील गरीबांची लेकर शिकत असलेल्या शाळा बंद केल्या जात आहेत. आश्रम शाळाची दुरावस्था होत आहे गरीबीचं प्रमाण वाढत आहे. आया बहिणी सुरक्षित नाही आहेत, अशा गेल्या 77 वर्षांत सत्तेतील आणी विरोधी पक्षांनी या देशातील राज्यातील जनतेचं वाटोळ केलं आहे.
माझी उमेदवारी म्हणजे वंचित शोषितांची लढाई – राजेंद्र निमसटकर
मी सामाजिक चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. माझी उमेदवारी म्हणजे शोषीत, वंचित, बहुजनांची उमेदवारी आहे. या निवडणुकीत वंचितांचा विजय निश्चित आहे. जर मतदारांनी मला निवडून दिल्यास कोणाताही जातीभेद, धर्मभेद न करता विधानसभा क्षेत्रात विकास कामे करण्यात कुठलीही कसर ठेवणार नाही. महायुती व महाविकास आघाडीला वंचित आपली जागा दाखवून देईल.
सध्या राजेंद्र निमसटकर यांचा वणी विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा झंझावात सुरु आहे. त्यांनी डोअर टू डोअर व कॉर्नर सभांचा धडाका लावला आहे. त्याला मतदारांचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. राजेंद्र निमसटकर हे मारेगाव तालु्क्यातून येतात. तर त्यांनी पत्रकारिता ही वणी तालुक्यात केली. त्यामुळे दोन्ही तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. शिवाय त्यांना येथील नागरिकांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. त्यांच्या प्रचारासाठी वंचितचे कार्यकर्ते प्रचाराला
Comments are closed.