पुरुषोत्तम नवघरे, वणी: बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या ‘वंदे मातरम्’ स्तोत्राला यंदा 150 वर्षे पूर्ण होत आहेत. या सार्धशताब्दी निमित्त वणी येथील शासकीय मैदानावर ‘भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन’ दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार असतील. प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समिर थेरे, तर मुख्य वक्ते म्हणून अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य व प्र. प्रशासन अधिकारी गजानन कासावार हे मार्गदर्शन करणार आहेत.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात वणी शहर व तालुक्यातील सुमारे 2,000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या प्रसंगी ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन होणार असून, राष्ट्रभक्तीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय रा. तेलतुमडे व वंदे मातरम् तालुकास्तरीय आयोजन समितीने वणीकर नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.




Comments are closed.