वणी तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेची नवीन कार्यकारिणी जाहीर

राजू गजरे तालुकाध्यक्ष, हेमंत टिपले सरचिटणीस; विविध पदांवर नवीन चेहरे

 

Birthday

बहुगुणी डेस्क, वणी: बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेची वणी तालुकास्तरीय नवीन कार्यकारिणी दि. 8 मार्च 2026 रोजी पुनर्गठित करण्यात आली. या कार्यकारिणीत तालुकाध्यक्षपदी राजू रमेश गजरे यांची तर हेमंत कुमार टिपले यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे विविध पदांवर नवीन चेहरे निवडण्यात आली. हिशोब तपासणीस आनंद पाटील, कोषाध्यक्ष खुशाल काळे, उपाध्यक्ष (संस्कार) प्रवीण वनकर, उपाध्यक्ष (प्रचार, पर्यटन व प्रसार) भास्कर मानकर, पर्यटन सचिव रवींद्र गायकवाड, कार्यालयीन सचिव दिलीप वाळके तसेच संस्कार सचिव गुणवंतराव खैरे यांची निवड करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रा. डॉ. उत्तम शेंडे, जिल्हा सरचिटणीस भगवानजी इंगळे, उपाध्यक्ष रमेश तेलंग, जिल्हा संघटक जंगले तसेच पांढरकवडा तालुका अध्यक्ष अण्णा मुन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वणी परिसरातील बौद्ध उपासक व उपासिका यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आयोजित या कार्यक्रमात महिला अध्यक्षा म्हणून सुचिता पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपासक व उपासिका सहभागी झाले असून जिल्हा कार्यकारिणी तर्फे सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असून संरक्षक मीराताई आंबेडकर आहेत. ट्रस्टी कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, रिपोर्टिंग ट्रस्टी हरीश रावलीया आणि जौंजाळे, तर कायदेशीर सल्लागार प्रकाश आंबेडकर आहेत.

Comments are closed.