रंगेल डॉक्टर पतीचा सीसीटीव्हीतून पत्नीनेच केला भांडाफोड

वणीतील डॉक्टरवर नागपूरमध्ये विविध गुन्हे दाखल

0

जब्बार चीनी, वणी: तो उच्चशिक्षित, पत्नीही उच्चशिक्षित. दोघांचाही आंतरजातीय विवाह. दोघेही वैद्यकीय व्यवसायात होते. मात्र उच्चशिक्षित असूनही पती सारखा पत्नीला त्रास द्यायचा. मारहाण करायचा. जातीवरून टोमणे मारायचा. हा एवढ्यावरच थांबला नाही तर तो बेडरुममध्ये मुली आणून ‘रंगेल’ चाळे ही करायचा. अखेर पत्नीनेच सीसीटीव्ही लावून त्याचा भांडाफोड केला. पत्नी सध्या नागपूरमध्ये राहत असून तो त्याच्या पत्नीकडे बँकेच्या लॉकरची चाबी मागायला आला होता. मात्र पत्नीने चाबी देण्यास नकार दिल्यावर त्याने पत्नीला मारहाण केली. याबाबत वणीतील आरोपी डॉक्टर शिरिष मांडेकर याच्याविरोधात नागपूर येथील बेलतरोडी पोलीस ठाण्यात घरगुती हिंसाचार, ऍस्ट्रोसिटी, हुंडाविरोधी, अनैसर्गिक संबंध इत्यादीविषयीच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मांडेकर याचे वणीतील बसस्टँड परिसरात हॉस्पिटल आहे.

तक्रारीत म्हटल्यानुसार, पीडिता या 2008 मध्ये सावंगी येथील मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. दरम्यान त्यांची त्याच  कॉलेजमध्ये शिकणा-या शिरीष मांडेकर याच्यासोबत ओळख झाली. दरम्यान शिरीष याने पीडितेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र दोघांच्याही जाती वेगळ्या असल्याने लग्नात येणा-या अडचणीबाबत पीडितेने आरोपीला कल्पना दिली. आपण दोघेही सुशिक्षित असल्याने जात पात हा मुद्दा आपल्यात येणार नाही असे वचन त्याने दिले. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन लग्नाची रितसर बोलणी केली. दोघांचे लग्न ठरले.

लग्नाच्या दहा दिवस आधी आरोपीचे कुटुंबीय पीडितेच्या घरी गेले व त्यांनी 50 तोळे सोन्याची हुंडा म्हणून मागणी केली. मात्र देण्याघेण्याच्या कोणत्याही गोष्टी झालेल्या नाही असे पीडितेच्या कुटुंबीयांद्वारे स्पष्ट करण्यात आले. मात्र आरोपी शिरीषने पीडितेला सोनं तयार करून घ्या नंतर मी त्याचे पैसे चुकते करेल असे सांगितले. त्यानुसार पीडितेच्या कुटुंबीयांनी 235 ग्रॅम सोन्याचे ब्रासलेट, नेकलेस, अंगठी असे दागिणे केले. 2010 रोजी त्यांचे नागपूर येथे धुमधडाक्यात लग्न झाले.

लग्नानंतर दोघांनीही वणीत एक हॉस्पिटल भाड्याने घेतले. मात्र त्या हॉस्पिटलमधून येणारी सर्व कमाई शिरीष स्वत:जवळ ठेवायचा. पीडितेने आरोपीजवळ वेळोवेळी सोन्यासाठी घेतलेल्या पैसे परत करण्याबाबत विचारणा केली असता, आरोपीने तुझ्या वडिलांना 50 तोळे सोने मागितले असताना 23 तोळे सोने दिले आणि तु पैसे परत मागत आहे असे उत्तर द्यायचा. त्यानंतर आरोपी शिरीष त्याच्या डॉक्टर पत्नीला सारखा मारहाण करायचा. शिविगाळ करायाचा. त्रास द्यायचा यासोबतच त्याने पीडितेसोबत अनेकदा अनैसर्गिक शारीरिक संबंधही ठेवले असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

प्रातिनिधिक फोटो

बेडरूममध्ये रंगायचा मुलींशी खेळ
प्रसुतीच्या काळात आरोपीने पत्नीला नागपूरला पाठवले. प्रसुती झाल्यानंतरही आरोपी अनेक दिवस पत्नीला भेटायला आला नाही. मात्र दरम्यानच्या काळात आरोपी पीडिता आणि तिच्या कुटुंबीयाना त्रास द्यायचा. अखेर पीडिता वणी येथील घरी गेली असता तिथे तिला निरोधचे पॉकेट दिसले. याबाबत तिने पतीला जाब विचारला असता. त्याची बोबडी वळाली. त्याने याबाबत थातुरमातूर उत्तर दिले. दरम्यानच्या काळात पतीचा त्रास आणि रंगेलपणा वाढल्याने काही महिन्यांआधी पीडिता नागपूरला आली. नागपूरलाच ती वैद्यकीय प्रॅक्टिस करत होती.

सीसीटीव्हीने केला रंगेल पतिचा भांडाफोड
पत्नी घर सोडून नागपूरला गेल्याने आता पतीला संपू्र्ण रान मोकळे झाले होते. दरम्यानच्या काळात शेजा-यांनी पत्नीला सांगितले की इकडे विविध मुलीसोबत पतीचे रंगेल चाळे सुरु आहे. दर वेळी वेगवेगळ्या मुली दिसतात अशी माहिती त्यांनी पत्नीला दिली. त्यानंतर पत्नी वणीला आली व तीने लपून घराच्या बेडरूमध्ये सीसीटीव्ही कॅमेर लावले. त्यात आरोपी अनेक मुलींशी अऩैतिक संबंध ठेवताना आढळून आला.

प्रातिनिधिक फोटो

यानंतर आरोपी एका व्यक्तीला सोबत घेऊन नागपूरला पीडिता राहत असलेल्या घरी आला. तिथे त्याने पत्नीकडे बँकेच्या लॉकरच्या चावीची मागणी केली. मात्र पीडितेने चावी देण्यास नकार दिला. अखेर आरोपी शिरीषने पत्नीला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पीडितेने जवळचे पोलीस स्टेशन गाठून आरोपी शिरीष मांडकर विरोधात तक्रार दिली. बेलतरोडी पोलीस ठाण्यात आरोपी शिरीष मांडेकर विरोधात भादंविच्या कलम 498 (अ) 377, 294, 506, 323, ऍट्रोसिटी कायद्याअंतर्गत 3 (1) (10) हुंडा विरोधी कायदा कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.