छ. शाहू महाराज शिक्षण संस्थे द्वारा व्हर्च्युअल कार्यक्रमांचे आयोजन

स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ऑनलाईन सांस्कृतिक कार्यक्रम

0

विवेक तोटेवार, वणी: स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हर्च्युअल आयोजन करण्यात आले आहे. यात डान्स, गायन, अनिभय, वकृत्व इत्यादी कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण विदर्भातील सुप्रसिद्ध गायिका व व्हाईस ऑफ मिहान, व्हाईस ऑफ बिग एफएम अश्विनी सोनटक्के नागपूर या असणार आहेत. याशिवाय संस्थेच्या विविध शाळेतील विद्यार्थ्यीही आपली कला या व्हर्च्युअल कार्यक्रमात सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा सर्वांना आस्वाद घेता येणार असून संस्थेच्या फेसबुक पेजवरून हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.

श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थे अंतर्गत येणा-या प्रायव्हेट आयटीआय वणी, वणी पब्लिक स्कूल ऍन्ड ज्युनियर कॉलेज, राजश्री शाहू महाराज हिन्दी विद्यालय वणी, हॅलो किड्स इंटरनॅशनल वणी, स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल मारेगाव, इंस्टिट्युट ऑफ फार्मसी मारेगाव इत्यादी शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी सहभागी होणार आहे.

दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या संस्थेत विविध कार्यक्रांचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांना एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्साहात व आनंदात कुठे ही कमी राहू नये यासाठी आम्ही संस्थेच्या वतीने व्हर्चुअल पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा निश्चय केला. व्हर्च्युअल कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्या विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी एकत्र येऊन कला सादर करण्याचा दुर्मिळ योग या निमित्ताने येणार आहे.
– ओमप्रकाश चचडा, सचिव श्री. छ. राजश्री शाहु महाराज शिक्षण संस्था

हा कार्यक्रम शिक्षण संस्थेच्या https://www.facebook.com/scsmss व https://www.facebook.com/officialiopm/ या पेजवर जाऊन ऑनलाईन बघता येणार आहे. तरी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ऑनलाईऩ सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.