वसंत जिनिंगचे राजकारण तापले, ऍड काळे यांचे संचालकपद रद्द
आजी-माजी अध्यक्षांमध्ये उफाळला वाद... कार्यवाही बेकायदेशीर, काळे यांची प्रतिक्रिया
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील महत्त्वाची सहकारी संस्था असलेल्या वसंत जिनिंगमध्ये सध्या राजकारण तापले आहे. आजी-माजी अध्यक्षांमध्ये सध्या चांगलाच संघर्ष दिसून येत आहे. वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी माजी अध्यक्ष व संचालक ऍड देविदास काळे यांचे संचालक पद रद्द केले आहे. तर काळे यांनी ही कारवाई नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येणा-या काही दिवसात हा वाद चांगलाच चर्चेत येण्याची शक्यता आहे. दिनांक 5 डिसेंबर रोजी आशिष खुलसंगे यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीला सतत गैरहजर राहण्याचे कारण देत काळे यांचे संचालक पद रद्द केल्याची माहिती दिली.
वसंत जिनिंगमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना आशिष खुलसंगे म्हणाले की ऍड देविदास काळे हे गेल्या 6 गैरहजर राहिले आहे. जर सलग तीन पेक्षा अधिक सभांना गैरहजर राहिल्यास संचालक पद रद्द केले जाऊ शकते. त्यावरून काळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई संदर्भात दिनांक 2 डिसेंबर रोजी अध्यक्ष व व्यवस्थापकांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. संस्थेच्या उपविधीच्या कलम 39 नुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती आशिष खुलसंगे यांनी दिली.
कार्यवाही बेकायदेशीर – ऍड देविदास काळे
याबाबत देविदास काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत ही कार्यवाही बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रिया दिली. एखाद्या संचालकाचे पद रद्द करण्याचा अधिकारी अध्यक्षाल किंवा व्यवस्थापकाला नाही. अध्यक्षांना आधी कारणे दाखवा नोटीस द्यावी लागते. अशी कोणतीही नोटीस मला आलेली नाही. तसेच बैठकीची कोणतीही सूचना मला देण्यात आलेली नाही. पद रद्द करायचे असल्यास त्याचा प्रस्ताव सहायक निबंधकांकडे पाठवावा लागतो.
ऍड देविदास काळे यांचा सहकार क्षेत्रात दबदबा आहे. त्यांनी 10 वर्ष वसंत जिनिंगचे अध्यक्षपद भूषवले. यासह ते रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. सध्या वसंत जिनिंगमध्येदोन गट पडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अध्ये मध्ये हा दोन गटातील वाद समोर येतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी असाच दोन गटात वाद झाला होता. मात्र निवडणुकीमुळे हा वाद थांबवण्यात आला होता. त्यानंतर आता निवडणूक झाल्यानंतर पुन्हा दोन गटातील वाद उफाळून आला आहे.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
Comments are closed.