वसंत जिनिंगचे अस्तित्व टिकवण्यासाठी जय सहकार पॅनलला बहुमताने निवडून द्या – ऍड. देविदास काळे

वसंत जिनिंगच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला...

जितेंद्र कोठारी, वणी: सहकारी चळवळीचा परिसराच्या आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण सहभाग आहे. मात्र शासनाने पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना झुकते माप देत विदर्भाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आपल्या भागातील सहकार क्षेत्र टिकवणे गरजेचे आहे. आपल्या परिसरात ज्या मोजक्या सहकारी संस्था आहेत. त्यात वसंत जिनिंग ही सर्वात महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे वसंत जिनिंगचे अस्तित्व टिकवण्यासाठी जय सहकार पॅनलला बहुमताने निवडून द्या असे आवाहन वसंत जिनिंगचे अध्यक्ष व जय सहकार पॅनलचे प्रमुख ऍड देविदास काळे यांनी केले आहे.

सहकार क्षेत्रात नावाजलेली दि वसंत सहकारी शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेड, वणीच्या संचालक मंडळ निवडणुकसाठी अवघे 5 दिवस शिल्लक आहे. वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा, घाटंजी तालुक्यात विखुरलेले तब्बल 10 हजारपेक्षा जास्त सभासद मतदारांच्या भेटीसाठी दिग्गज नेत्यांसह उमेदवार दिवसरात्र एक करत आहे. काँग्रेस व भाजपसह 4 पॅनल निवडणूक मैदानात आहे.

वसंत जिनिंगचे विद्यमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांचा नाव सहकार क्षेत्रात अग्रगण्य आहे. मागील 10 वर्षापासून वसंत जिनिंगचे अध्यक्ष पदावर असताना त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेऊन डबघाईस आलेल्या या संस्थेला संकटातून बाहेर काढले. वर्ष 1964 मध्ये स्थापित वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी या संस्थेने मागील 48 वर्षात अनेक चढउतार पाहिले. राज्यात पणन महासंघाची कापूस खरेदी सुरु असताना वसंत जिनिंगचा बोलबाला होता. कालांतरमध्ये राज्यात खाजगी व्यापाऱ्यांना कापूस खरेदीची परवानगी देण्यात आली. त्यामुळे मागील 20 वर्षात या भागात मोठ्या प्रमाणात खाजगी जिनिंग प्रेसिंग कारखाने उभे झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पश्चिम महाराष्ट्रात सहकार संस्थांना राज्य शासनाने नेहमी झुकता माप दिले. मात्र विदर्भात डबघाईस आलेल्या सहकारी संस्थांना शासनाने वाऱ्यावर सोडले. अशातच 2010 मध्ये ऍड. देविदास काळे यांनी वसंत जिनिंग फॅक्टरीची धुरा सांभाळली. ऍड. काळे यांनी व्यापारी दृष्टीकोण समोर ठेवून बंद पडलेले युनिट खाजगी व्यापाऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्याचे ठरविले. त्यातून संस्थेला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळाले. पुढे वसंत जिनिंगची वणी येथील जागा 21 कोटी मध्ये विकून त्यातून उत्पन्नाचे इतर स्त्रोत तयार करण्यात आले.

आज संस्थेची वणी, मारेगाव, मुकूटबन, शिंदोला व मार्डी अशा 5 ठिकाणी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आहे. तसेच वणी, कायर, शिंदोला, घोंसा, मारेगाव, मार्डी, मुकूटबन या 7 ठिकाणी संस्थेचे कृषी केंद्र कार्यरत आहे. याशिवाय वणी येथे शेतकरी मंदिर सभागृह, वसंत जिनिंग हॉल व लॉन तर मारेगाव येथे मंगल कार्यालय आहेत. हे सध्या संस्थेचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. आज संस्थेकडे 22 कोटी, 50 लाख 8 हजार 919 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर संस्थेवर फक्त 1 कोटी 75 लाख रुपयांचे कर्ज आहे. संस्थेमध्ये सध्या 20 कर्मचारी नोकरीवर आहेत. तर आज संस्थेचे सुमारे 11 हजार सभासद आहेत.

हे देखील वाचा: 

वसंत जिनिंग – काय आहे या संस्थेचा इतिहास आणि कसा बदलला संस्थेचा चेहरामोहरा ?

Comments are closed.