वसंतराव उदकवार यांची जयंती साजरी

पोलीस व आरोग्य कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

0

सुशील ओझा, झरी‌: तालुक्यातील मुकुटबन येथील जय बजरंग शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक वसंतराव उदकवार यांच्या ७१ व्या जयंती निमित्त अभिवादनपर कार्यक्रम झाला. या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशनचे कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर व आर्सेनिक चे वाटप करण्यात आले.

वसंतराव उदकवार यांनी आपल्या जीवनातील सुख दु:ख बाजुला ठेऊन तालुक्यातील तसेच बाहेरील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार केला. वसंतरावांनी कित्येकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्यात. या संस्थेमधून शिक्षण घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी उतुंग भरारी मारली. आयुष्यामध्ये खूप मोठे यश प्राप्त केले. तसेच काही विद्यार्थी विविध पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

यांच्या मार्गदर्शनातून घडणाऱ्या कित्येकांचे आयुष्य हे सक्षम बनले आहे. कित्येकांच्या यशामागे यांच्या मार्गदर्शनाची थाप ही पाठीवर असते. कित्येकांना हे प्रेरणास्थान ठरले आहे.‌‌ विद्यार्थ्यांसाठी मोठे सर म्हणून त्यांची एक आठवण कायमस्वरूपी अविस्मरणीय राहील.

अवघ्या तालुक्यातील‌ तसेच बाहेरील‌ विद्यार्थ्यांना या संस्थेमार्फत शिक्षणाचा वसा हा त्यांचे तिन्ही मुले गणेश उदकवार, संकेत उदकवार व प्रवीणा उदकवार हे चालवित आहेत.

या कार्यक्रमाला संस्थेचे मानद सचिव गणेश उदकवार, वसंत इंग्लीश मीडियम स्कूलचे संस्थापक संकेत उदकवार, प्रवीणा उदकवार, सरवस्ती माध्यमिक विद्यालयच्या मुख्याध्यापिका ममता जोगी, माध्यमिक आश्रम शाळा व मातोश्री पुनकाबाई कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य परचाके, प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक वैद्य, पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनुने, चक्रधर तीर्थगिरीकर, श्रीहरी चेलपेलवार, दरबेश्वार‌, डॉ. लोडे, ताडशेट्टीवार, विकास मंदावार, विलास बरशेट्टीवार, पोलिस कर्मचारी पुरूषोत्तम घोडाम, सुलभ उइके, नीरज पातुरकर, स्वप्नील बेलखडे, नहीम शेख, प्रज्योत ताडुरवार, आरोग्य विभागाचे डॉ .देवढगले, डॉ. देवतळे आणि संस्थेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.