गिरीश कुबडे, वणी: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडी तर्फे 20 जानेवारीला आमदार निवास येथे विदर्भवादी युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उदघाटन सकाळी ११.०० वाजता होईल. या संमेलनात वेगळा विदर्भ का ?, वेगळ्या विदर्भ राज्याचे फायदे, विदर्भाचे अर्थशास्त्र, विदर्भाची बेरोजगारी, कुपोषण, नक्षलवाद तसेच विदर्भ आंदोलनात युवांचा सहभाग, विदर्भ आंदोलनाची पुढील दिशा इत्यादी विषयांवर समितीचे तज्ज्ञ युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते, माजी आमदार ऍड.वामनरावजी चटप,समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले,महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रबिरकुमार चक्रवर्ती व समितीचे अमरावती विभाग अध्यक्ष प्रदीप धामनकर उपस्थित राहतील. संमेलनाला जास्तीत जास्त युवा विदर्भवाद्यांना उपस्थित राहन्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा युवक अध्यक्ष राहुल खारकर, जिल्हा उपाध्यक्ष केतन ठाकरे, जिल्हा सचिव राहुल खिरटकर, वणी तालुका अध्यक्ष आकाश सुर, वणी तालुका संघटक उत्तम पाचभाई, झरी तालुका अध्यक्ष राकेश वराटे, दिपक नरवडे, प्रफुल पांगुल, प्रियल पथाडे यांनी केले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post