महाराष्ट्र दिनाला विधान भवनावर विदर्भाचा झेंडा फडकवणार

1 मेला विदर्भ जनआंदोलन समितीचे आंदोलन

0

गिरीष कुबडे, वणी: विदर्भ जनआंदोलन समितीने पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी रणशिंग फुंकले आहे. 1 मेला महाराष्ट्र दिनाला विधान भवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडवणार असल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी दिली. गुरुवारी दुपारी 4 वाजता वणीतील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

Podar School 2025

या प्रसंगी विदर्भावादी नेते ऍड. वामनराव चटप, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम पाटील, जिल्हा अध्यक्ष ऍड.सुरज महारतळे, देवराव धांडे, रफिक रंगरेज, बालाजी काकडे,रुद्धा कुचनकर,राहुल खारकर, दिलीप भोयर, मिलींद पाटील, शालिनी रासेकर, विजया आगबत्तलवार, संगीत खटोड इत्यादींसह विदर्भ जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

लिंकवर क्लिक करून पाहा काय म्हणाले वामनराव चटप…

Leave A Reply

Your email address will not be published.