वीज वितरण कंपनीकडून विद्युत सुरक्षा सप्ताह
रफीक कनोजे, झरी: विद्युत सुरक्षा सप्ताह (११ ते १७ जानेवारी) निमित्ताने झरी, पाटण, मुकुटबन व घोंसा येथील कार्यालय अंतर्गत गावामध्ये विद्युतचा वापर कसा करावा व त्या पासुन कशी सुरक्षा करावी संबधीत माहिती देण्यात आली. तसेच शेवटच्या दिवशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षन संस्था झरीच्या विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रभातफेरी काढुन जनजागृती करण्यात आली.
राहुल पावडे, उप कार्यकारी अभियंता यांनी ह्या सुरक्षा सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतकर्यांनी वन्यप्राण्यां पासून पीक संरक्षणासाठी तार कंपाउंड मधे विद्युत प्रवाह टाकु नये, विद्युत चोरी करु नये, ओल्या हाताने विद्युत प्रवाहाचे कोणतेही विद्युत उपकरण वापरु नये, वीज वाहिनीवर आकडे टाकू नये, विद्युत वाहिनी पासून सुरक्षित अंतर ठेवावे. असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अभियंता चामाटे, नंदलवार, मालके, चव्हाण तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.