घोन्सा येथे रविवारी मोफत भव्य नेत्र रोग चिकित्सा शिबिर

विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून रविवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी घोन्सा येथे मोफत आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा, मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दु. 4 या वेळेत संत गजानन महाराज मंदिर येथे हे शिबिर होणार आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरात कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्रामची चमू आरोग्य सेवा देणार आहे. मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांना सेवाग्राम येथे उपचारासाठी पाठवण्यात येईल. आवश्यक रुग्णांना चष्मे तयार झाल्यानंतर त्याचे वाटप केले जाणार आहे. सदर शिबिराचे आयोजन स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन वणी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी उपजिल्हा शाखा व चोरडिया हॉस्पिटल वणी तर्फे करण्यात आले आहे. या शिबिरात घोन्सा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन विजय चोरडिया यांनी केले आहे.

 

शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा – विजय चोरडिया
गेल्या काही वर्षांपासून परिसरात नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत याचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे. या शिबिरात रुग्णांना मोफत औषधी, तसेच चष्मा दिला जाणार आहे. ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांना सेवाग्राम येथे पाठवून मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार केला जाणार आहे. या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा.
– विजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते

या शिबिरासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. नाव नोंदणी न झालेल्या रुग्णांना वेळेवर शिबिर स्थळी नाव नोंदणी करता येईल. शिबिराच्या नियोजनासाठी रेड क्रॉस सोसायचीची चमू, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विजय चोरडिया यांचे सहकारी परिश्रम घेत आहे. गेल्या काही काळापासून वणी विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी विजय चोरडिया यांच्या पुढाकाराने नेत्र रोग चिकित्सा शिबिराचे आयोजन केले गेले. याचा आतापर्यंत हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे. तर शेकडो रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडली.

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क-
राजू रिंगोले – 9284881655
अक्षय वैद्य – 8408809141
सचिन क्षीरसागर – 8308340293

Comments are closed.