विजय चोरडिया यांचा झंझावात, ठिकठिकाणी पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन

ग्रामीण भागात जनसंपर्काचा धडाका... लवकरच जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

निकेश जिलठे, वणी: गेल्या दोन महिन्यांपासून भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्या विविध कामांचा धडाका सुरु आहे. त्याला आता संघटनात्मक कार्याची जोड मिळाली आहे. ठिकठिकाणी विजय चोरडिया यांच्या नेतृत्त्वात पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम सुरु आहे. ग्रामीण भागात त्यांचा जनसंपर्क दौरा सुरु असून त्याला गावक-यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या नेतृत्त्वात वणी शहरासह व ग्रामीण भागातील महिला व युवक मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. वाढती लोकप्रियता, सामाजिक कार्य व संघटनात्मक कार्य यामुळे विजय चोरडिया यांची जनसामान्यात त्यांची केवळ लोकप्रियता वाढलेली नाही, तर त्यांची दावेदारी देखील मजबूत झाली आहे.

वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रम राबवणारे नेते म्हणून विजय चोरडिया यांची वणी विधानसभा क्षेत्रात ओळख आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे आरोग्य शिबिर व विविध धार्मिक उपक्रम सुरु आहेत. त्याला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचा अभाव ओळखून विजय चोरडिया यांनी अधिकाधिक शिबिर हे ग्रामीण भागात आयोजित केले. एकीकडे सामाजिक व धार्मिक उपक्रम सुरु असताना त्यांनी आता संघटनात्मक पातळीवरील उपक्रमांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. विजय चोरडिया यांच्या जनसंपर्क दौ-याला ग्रामीण भागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरुणाई व माता भगिणी त्यांच्या नेतृत्त्वाकडे आकर्षीत होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या ठिकठिकाणी पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात येत आहे.

ग्रामीण भाग टारगेटवर
नुकतेच बेलदारपुरा येथील श्री गणेश मंदिर व जैताई मंदिराच्या सभागृहात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात त्यांच्या नेतृत्त्वात शेकडो महिलांनी व युवकांनी पक्ष प्रवेश केला. तसेच मारेगाव तालुक्यातील बुरांडा (खडकी) येथील महिला व युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामीण भागातील दौ-यात गावकरी त्यांच्याजवळ समस्या व तक्रारी बोलून दाखवत आहे. गावागावात त्यांच्या नेतृत्त्वात पक्षप्रवेश कार्यक्रम ठरत आहे. येत्या एक आठवड्यात आणखी एक जम्बो पक्ष प्रवेश असल्याची माहिती आहे.

लवकरच जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
सर्वसामान्य जनतेचे काम करण्यासाठी, त्यांच्या समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जनसंपर्क कार्यालय स्थापन करण्यात येत आहे. टिळक चौक येथे कार्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच या कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. कार्यालयामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या तक्रारी व अडीअडचणीसाठी विजय चोरडिया यांच्याशी थेट संपर्क साधता येणार आहे.

जैताई मंदिर येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष दिनकर पावडे, विजय पिदूरकर, पवन एकरे, अशोक सिंग या सह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.