750 पेक्षा अधिक रुग्णांना चष्मे वाटप, विजय चोरडिया यांचा उपक्रम

वणीतील जैताई मंदिर व पाटण येथे बालाजी मंदिरात कार्यक्रम संपन्न

बहुगुणी डेस्क, वणी: दातृत्वाचे धनी म्हणून ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते व भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्या तर्फे नेत्र शिबिरातील 750 पेक्षा अधिक रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी स. 11 वाजता वणीतील जैताई मंदिरात तर दुपारी 12 वाजता पाटण येथील बालाजी मंदिरात हा कार्यक्रम पार पडला.

स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशन व विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून दिनांक 27 जुलै रोजी वणीत तर 1 ऑगस्ट रोजी पाटण येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिर पार पडले होते. पाटण येथील शिबिरातील 400 रुग्णांना तर वणी येथील 350 रुग्णांना डॉक्टरांनी चष्मा वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार शिबिरानंतर तातडीने सुमारे 750 चष्मे तयार करण्यात आले. चष्मे तयार झाल्यानंतर शनिवारी वणी व पाटण येथे रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते चष्मा वाटप करण्यात आले.

वणी येथे विजय चोरडिया, मुन्ना महाराज तुगनायक, राजा जसस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत तर पाटण येथे रामलू आईटवार व विशाल दुधबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चष्मा वाटप कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानंतर रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. पुढील नेत्र चिकित्सा शिबिर हे घोन्सा येथे होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाला शुभम डोंगे पाटील, उमेश पोद्दार, राजू रिंगोले, अशोक सिंग, सागर मुने, महावीर कटारीया, मनोज केळकर, फैजान शेख, निखिल पावडे, पवन काळे, अजिंक्य अक्केवार, प्रतिभा खोब्रे व एकल विद्यालय मुकुटबनची चमू उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्णू हिंदू परिषद, बजरंग दलचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. 

Comments are closed.