विजय चोरडिया यांचा वणी विधानसभा क्षेत्रात सामाजिक कार्याचा धडाका

रोज नवनवीन उपक्रम, लोकप्रियतेमुळे चोरडिया यांची दावेदारी मजबूत

निकेश जिलठे, वणी: विजय चोरडिया सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. नेत्र तपासणी आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम वर्षभर राबवीत असतात. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपल्या दातृत्वासाठी ते परिसरात प्रसिद्ध आहेत. शेकडो दिव्यांगांना त्यांनी मदत केली आहे. चोरडिया यांना विद्यार्थी आणि शिक्षणाप्रती विशेष आस्था आहे. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असते. ते शिक्षण घेऊ शकत नाही किंवा पूर्ण करू शकत नाही. त्यांच्यासाठी विजय चोरडिया धडपड करतात. अनेक अडल्यानडल्यांना ते मदत करतात. याचाच अनुभव परिसरातील अनेकांना आला आहे.

नुकतेच विजय चोरडिया यांनी एका अपंग विद्यार्थीनाला मदत केली आहे. श्रेया अनिल भोंगळे या विद्यार्थिनीला कमरेपासून पायाला अपंगत्व आले. ही निसर्गाची अवकृपा. मात्र त्यावर तिने मात केली. मनात शिकण्याची इच्छा आणि जिद्द होती. या अपंग विद्यार्थिनीने भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांच्याशी संपर्क साधला. विजय चोरडिया यांनी लगेच वणी अर्बन निधी मार्फत श्रेया भोंगळे हिला शिक्षणासाठी कम्प्युटर व इतर साहित्यांची भेट दिली.

प्रकाश बाबुलाल भोयर हे वणीतील गोकुळ नगर येथील रहिवासी आहे. यांना बालपणापासून पोलिओ हा आजार होता. त्यातच त्यांचा अपघात झाला. त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु शस्त्रक्रिया बरोबर न झाल्याने त्यांना अपंगत्व आले. त्यांना चालता फिरता येत नव्हते. ही बाब त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी विजय चोरडिया यांच्या लक्षात आणून दिली. चोरडिया यांनी तत्काळ दखल घेऊन त्यांना तीनचाकी सायकल भेट देऊन त्यांना सहकार्य केले. यासह इमारतीवरून खाली पडलेल्या मजुराच्या कुटुंबीयांनाही त्यांनी आर्थिक मदत केली होती.

लोकप्रियतेमुळे विजय चोरडिया यांची दावेदारी मजबूत?
अनेक उमेदवार निवडणूक जवळ आली की दावेदारी दाखल करण्यासाठी विविध उपक्रम राबवतात. मात्र विजय चोरडिया हे याला अपवाद आहेत. त्यांचे संपूर्ण वर्षभर केवळ वणीच नाही तर तिन्ही तालुक्यात विविध उपक्रम सुरु राहते. त्यांच्या उपक्रमांमुळे व दातृत्वाच्या स्वभावामुळे त्यांच्या लोकप्रियतेत वाढ प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांआधी विजय चोरडिया यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी दावेदारी दाखल केली. त्याच्या लोकप्रियतेमुळे चोरडिया यांची दावेदारी दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचे बोलले जात आहे.

 जन्माष्टमी महोत्सवात कार्यक्रमांची मेजवानी
26 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी आहे. दरवर्षी चोरडिया यांच्या पुढाकारातून जन्माष्टमी सप्ताह राबवला जातो. या निमित्ताने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वणीकर दर वर्षी यावेळी नवीन काय याची आतुरतेने वाट पाहत असते. यावेळीही वणीकरांना अशीच धार्मिक व सांस्कृतिक मेजवानी राहणार आहे, दिनांक 22 ऑगस्टला सुप्रसिद्ध गायक लखबीर सिंह लख्खा यांच्या कार्यक्रमाने जन्माष्टमी सप्ताहाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर संपूर्ण आठवडा विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा भाविकांसाठी राहणार आहे, अशी माहिती विजय चोरडिया यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

Comments are closed.