ऍड विजया मांडवकर शेळकी यांचे निधन

स. 11 वाजता बोधे नगर येथून निघणार अंत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: ऍड विजया विश्वास शेळकी मांडवकर (50) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या बोधेनगर चिखलगाव येथे कुटुंबीयांसह राहत होत्या. त्यांना मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराचा तीव्र धक्का आला होता. संध्याकाळी साडे सात वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्या वणी न्यायालयात सेवा द्यायच्या. तसेच त्या राजूर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य देखील होत्या. एक वकिल व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पती, मुलगी व आप्त परिवार आहे. त्यांच्या एकाएकी निधनाने शोक व्यक्त केला जात आहे. त्यांची अंत्ययात्रा आज बुधवारी दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता त्यांचे राहते घर बोधे नगर चिखलगाव येथून निघणार आहे. दरम्यान वणीतील वकिलांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Comments are closed.