शाब्बाश… ‘या’ गावाने स्वतःला केले क्वारंटाईन !

गावाच्या वेशीवर 'नो एन्ट्री'चा बोर्ड, ओळख पटवल्यावरच एन्ट्री

0

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरी भागात संचारवंदी लागू करावी लागली . रस्ते निर्मनुष्य करण्यासाठी जागोजोगी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत आहे . मात्र यातही काही सुखद बातम्या कानी पडत आहेत . भालर या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सबंध गावच क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला . स्वतच: गावच्या सीमा सील करुन , बाहेरील व्यक्तीना नो एंट्री केली आहे . अशी स्वयंस्फूर्त उपाययोजना झरी तालुक्यातील दुर्भा गावानेही केली आहे.

शहराबरोबरच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना आता शहरापुरता सिमीत राहिला नसुन आता त्याचे खेड्याकडे हळूहळू आगमन होत आहे . शहरात कायम स्थायिक झालेले नागरिक , शिक्षण व नोकरीनिमित्ताने शहरात असलेल्या युवकांनी आता खेड्याची वाट धरली आहे . त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची लागण झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.

वेकोलिची भालर टाउनशीप गांवाजवळ असुन नुकतेच नवीन पोरं तिथे आले आहेत. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर प्रत्येकाने खवरदारी घेणे आवश्यक असल्याने भालर येथील युवा एकता बहुद्देशीय संस्थेच्या युवकांनी सरपंचाला गाँव वंदी करण्याची परवानगी मागीतली. सरपंच नरेद्र वरारकर यांनी होकार दोला . कोरोनाशी दोन हात करण्यासाठी गावातील व्यक्तीने दुसया गावी जाऊ नये , तसेच बाहेरून कोणत्याही नव्या व्यक्तीला गावात प्रवेश दिला जाणार नाही , असे सक्तीचे आदेशच दिले आहेत .

गावातील ग्रामस्थानी घराबाहेर न जाणं , सतत हात धुणे , सॅनीटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना ग्रामपंचायततर्फे दिल्या जात आहेत . गावातील सगळी दुकानेही बंद ठेऊन गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे . दररोज संपूर्ण गावात ट्रॅक्टरने सनीटायझरची फवारणी आणि ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती केली जात आहे . संचारवंदीमुळे गावात सर्वत्र शांतता आहे . कोरोनाच्या धास्तीने ग्रामस्थ आपापल्या घरातच थांबून आहेत . गावांच्या प्रवेशद्वाराला बांबु ने बंद करण्यात आले असून तिथे लोक बसन असतात . महत्वाचे काम असेल आणि ओळख पटली तरच व्यक्तीला गावात प्रवेश दिला जातो.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.