रवी गॅस एजन्सीची अत्यावश्यक सेवेसोबत मास्क वाटप सेवा

ग्राहकांना केले जात आहे मोफत मास्कचे वाटप

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता त्याची सर्वांनीच धास्ती घेतली आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंग सोबतच मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करण्याचे सांगितले जात आहे. वणीमध्ये सध्या रवि गॅस एजन्सी संचारबंदीतही लोकांना सिलिंडर देण्यासाठी जोमाने कामाला भिडलेली आहे. या व्यतिरिक्त रवि गॅस एजन्सीने ग्राहकांना मोफत मास्क वाटप करण्याचा उपक्रमही सुरू केला आहे.

सध्या संचारबंदी सुरू असल्याने केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहे. रवी गॅस एजन्सी संचालक रवींद्र निखार व सर्व कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून जनसेवा हीच ईश्वर सेवा असे ब्रिद वाक्य घेऊन नागरिंकाना गॅस सिलेंडर चा वाटप करून सेवा देत आहे. त्यातच अऩेक ग्राहक कार्यालयात विना मास्कने येतात. अशा ग्राहकांना एजन्सीतर्फे मोफत मास्क वाटप केले जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संचारबंदी व जमावबंदी सुरू असल्याने सध्या घराबाहेर पडू नये. एकत्र येऊ नये तसेच वरचेवर सॅनिटायझर व हॅन्डवॉशने हात धुवावे असे आवाहन रविंद्र निखार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.