मुकुटबन येथे पाणी टंचाईमुळे ग्रामवासी त्रस्त

मुबलक पाणी साठा असून नियोजन शून्य

0
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी १५ सदस्यीय ग्रामपंचायत असून १२ हजार लोकसंख्या असलेले गाव म्हणून मुकुटबन गावाची ओळख आहे. मुकुटबन येथे ५ वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डात तीन सदस्य निवडून आले आहे. दोन महिन्यापूर्वी नवीन बॉडी विराजमान झाली परंतु पहिलीच समस्या सोडविण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गावाला पाणीपुरवठा करण्याकरिता बोअर,व नदीच्या पाण्याचा वापर होत आहे. पाणी पुरवठा करिता पूर्ण वर्ष पाणी संपणार नाही एवढे मुबलक पाणी साठा आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण गावात पाणी टंचाई चे चटके ग्रामवासीयांना सोसावे लागत आहे.
पाणी मुबलक असतांना ग्रामवासीयांना पाणी  मिळत नसल्याने सरपंच सह संपूर्ण सदस्यांवर संताप व्यक्त होत आहे. उन्हाळा लागताच ग्रामवासीयांना पाण्याकरिता ओरडावे लागत असेल तर संपूर्ण  उन्हाळभर पाणी मिळणार की भटकावे लागणार असे बोलले जात आहे.यापुर्वी  ग्रामपंचायतवर पाच वर्षे माजी सरपंच शंकर लाकडे माजी उपसरपंच अरुण आगुलवार यांची सत्ता होती . त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात एकही दिवस पाणी टंचाई किंवा इतर समस्या गावकर्यांकरिता निर्माण झाल्या नाही. गावातील नाल्या सफाई,मुख्य मार्गावरील साफसफाई,कचरा गाडी वेळेवर येऊन कचरा घेऊन जाणे, २४ तास शुद्ध पाण्याची व्यवस्था वेळेवर केले जात होते.
पाच वर्षात ग्रामवासीयांना कोणतेही त्रास झाले नाही तसेच जनतेच्या एका तक्रारीवरून त्वरित समस्याचे निराकरण केल्या जात होते. गावातील नाल्या, रस्ते,सार्वजनिक सौचालय, वाचनालय , स्मशानभूमी व इतर अनेक विकास काम करून जनतेचे मन जिंकले आहे. अश्याया विकास कामाची अपेक्षा नवीन विराजमान झालेल्या बॉडी कडून जनतेची आहे. परंतु पाण्याची पहिलीच समस्या निर्माण होतात ग्रामवासीयांना जुनी बॉडीची आठवण काढल्या जात आहे.  ग्रामवासीयांनी चांगल्या विकास कामाकरिता जनतेनी निवडून दिलेल्या ग्रामपंचायत सदस्य कडून मोठी अपेक्षा केली आहे परंतु पहिल्याच  पाण्याच्या समस्या वरून गावात वेगळेच  सूर ऐकला मिळत आहे.
पाच वर्षे लाकडे यांच्या काळात व सहा महिने प्रशासक काळात जनतेला कधीच कोणत्याही समस्या जाणविल्या नाही हे विशेष. परंतु आज पाचही वॉर्डात पाण्याची समस्या झाली आहे. पाणी मुबलक असतांना जनतेला पाणीपुरवठा का होत नाही ? पाईपलाईन व बोअर सर्व बरोबर आहे , ग्रामपंचायत ला कर्मचारी तेवढेच आहे मग पाणीपुरवठा का होत नाही असा संतप्त प्रश्न ग्रामवासी उपस्थित करीत आहे. नियोजन शून्य व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.हेच काम जुन्या बॉडीला जमलं ते नवीनला का जमत नाही अशीही चर्चा केली जात आहे. 
याबाबत सरपंच सौ मीना जगदीश आरमुरवार यांना विचारणा केली असता गावातील समस्या सोविण्याकरिता आम्ही प्रयत्नशील असून जिथे पाण्याची समस्या आहे तिथे वॉल बसविणे सुरू आहे तसेच काही तांत्रिक अडचणी मुळेही  पाण्याची समस्या उदभली असून आम्ही लवकरात लवकर ती समस्या मार्गी लावू असे सांगितले.
तर सचिव कैलास जाधव यानी सांगितले की गावाला पाण्याची कमी नाही पाणी मुबलक आहे ब्लिचिंग पावडर सुद्धा आहे. परंतु पाणी पुरवठा  कर्मचारी  ठरलेल्या वेळेवर पाणी पुरवठा करीत नसल्याने  गावकर्यांना पाणीटंचाई जाणवत असल्याची शक्यता वर्तविली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.