आदर्श विद्यालयात आनापान व विपश्यना साधना शिबिर
आनापान व विपश्यना तणावमुक्तीसाठी बहुमोलाचा पर्याय: वैजनाथ खडसे
शिंदोला: आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मानवी मनावर दिवसागणिक निर्माण होणारा ताणतणाव दूर व्हावा व मानवी समग्र वर्तनात बदल घडून स्वतःची ओळख निर्माण व्हावी, माणसाच्या प्रकृतीवर आक्रमण करणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सरावर जर मात करायची असेल तर आनापान व विपश्यना हा एक बहुमोलाचा पर्याय आहे, असे मत प्रशिक्षक वैजनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
वणीच्या आदर्श विद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.एन. झाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सुरेश घोडमारे, साधनाताई गोहोकार उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांना विपश्यना साधनेतून सर्वांगिण विकास साधण्यासाठी एक तासाचे प्रशिक्षण देण्यात आले. उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
(हे पण वाचा:मुकुटबन येथे बैलजोडी सजावट स्पर्धा संपन्न)
शिबिराच्या यशस्वीतेसाठी लता पाटणकर, रुपलाल राठोड, शंकर पिदूरकर, संध्या लोणारे, पूनम सिंग, यशवंत भोयर आदी शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले।