सुतार समाजाच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव शनिवारपासून
रोहण आदेवार, वणी : मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था वणी, सुतार समाज युवा मंच व महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सुतार समाजाचे आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव दिनांक १६ व १७ फ्रेबुवारी २०१९ रोज शनिवार व रविवारला महादेव मंदिर, सुतारपुरा वॉर्ड येथे आयोजित करण्यात आली आहे,
दरवर्षी प्रमाणे याही वर्षाला सुतार समाजच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव मोठ्या हर्षाने व आनंदात साजरा करण्यात येणार आहे. दिनाक १६ फ्रेबुवारी रोज शनिवार ला रात्री ८:०० वाजता भजन होईल. दिनांक १७ फ्रेबुवारी रोज रविवारला सकाळी ९ ते ११ ला श्री प्रभू विश्वकर्मा मूर्ती व प्रतिमेची शोभायात्रा महादेव मंदिर सुतार पुरा वॉर्ड येथून निघून नटराज चौक, गांधी चौक,जटाशंकर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, टागोर चौक, सर्वोदय चौक, भगत सिंग चौक, गाडगे बाबा चौक वरून महादेव मंदिर सुतारपुरा येथे समारोप होईल.
शोभायात्रेत समाजातील महिलांकरिता चौकाचौकांत रांगोळी स्पर्धा व कलश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच शोभायात्रेत बँड पथक, कलशधारी महिला, समाज बांधव व महिला सहभागी असणार आहे. त्यानंतर सकाळी ११:०० वा श्री प्रभू विश्वकर्मा पूजन व हळदीकुंकूवाचा कार्यक्रम होईल. यावेळी सोनाली व मयुर झिलपे व प्रिया व सुहास झिलपे ही दाम्पत्ये पूजन करणार आहे.
दुपारी १२:०० वा श्री प्रभू विश्वकर्मा जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष गौरव भास्करराव दांडेकर नगरसेवक ,पुलगाव, उद्घाटक राजेंद्र जगन्नाथजी नवघरे अध्यक्ष इंटकं युनियन वेकोली, प्रमुख पाहुणे मयूर विष्णुजी दहिकर कानिष्ठ अभियंता बांधकाम विभाग न. प. वणी, किसन दुधलकर, प्रचार मंत्री महासंघ, अशोक बुरडकर, सल्लागार महासंघ, अमन बुरडकर, अध्यक्ष म. वि. झाडे, सुतार समाज संस्था वणी महेश पंढरी राखुंडे अध्यक्ष युवा मंच आरती गणेश वांढरे अध्यक्षा महिला मंच तथा नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमात आयोजित रांगोळी व कलश सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल. तसेच समाजकार्यात आपले सम्पूर्ण आयुष्य खर्ची घालून समाज सेवा करणाऱ्या समाज बांधवांना सुतार समाजरत्न केसरी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या नंतर सायं ६:०० वाजता समाजातील लहान मुलांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. वरील सर्व कार्यक्रम महादेव मंदिर सुतार पुरा वॉर्ड, वणी येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी शहरातील व परिसरातील सर्व सुतार समाजबांधवानी मोठ्या
संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती सुतार समाज संस्था वणी यांनी केले आहे.