पत्रकारांच्या न्याय मागण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाचा पुढाकार

वणी बहुगुणी डेस्क : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांकडे पहिले जाते. मात्र माध्यमकर्मींयांचे प्रश्न सोडवणुकीच्या दृष्टीने शासनाकडून ठोस उपाय योजना केल्या जात नाहीत. त्यामुळे पत्रकारांची सर्वात मोठी संघटना व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून गुरुवारी एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या विविध मागण्या संबंधी निवेदन प्रशासनाला देण्यात आले. वणी येथे ही व्हॉइस ऑफ मीडिया तालुका संघटनांतर्फे उपविभागीय अधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. 

पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोना काळात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे तसेच ‘क ‘ वर्ग दैनिकांना आणि साप्ताहिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकां इतक्याच शासकीय जाहिराती देण्यात याव्यात. अश्या मागण्याचे निवेदन देताना व्हॉईस ऑफ मिडियाचे वणी तालुका अध्यक्ष मनोज नवले, उपाध्यक्ष गणेश रांगणकर, सचिव विवेक तोटेवार, सल्लागार जितेंद्र कोठारी, मोरेश्वर ठाकरे, नरेंद्र लोणारे, श्रीकांत किटकुले, शुभम कडू, दीपक जोगी हजर होते.

Comments are closed.