2 लाख 84 हजार 497 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

वणी विधानसभेत 323 मतदान केंद्र

0

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्राची सार्वत्रिक निवडणूक दि. 21 ऑक्टोबरला होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी 1लाख 47 हजार 553 पुरुष व 1 लाख 36 हजार 944 स्त्री मतदार तसेच सैन्य दलातील 268 मतदार असे एकूण 2 लाख 84 हजार 765 मतदार या निवडणुकीसाठी मतदान करण्यास पात्र आहेत. वणी, मारेगाव, झरी तालुका मिळून तयार झालेल्या या वणी विधानसभा निवडणुकीत 323 मतदार केंद्रावर निवडणूक घेण्यात येणार आहे अशी माहिती येथील उपविभागीय अधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी घेतलेल्या पत्र परिषदेत दिली.

या निवडणुकीसाठी एकूण 1422 मतदान अधिकारी व 32 सेक्टर ऑफिसर ची नेमणूक करण्यात आली आहे. यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग दि. 29 व 30 सप्टेंबरला घेण्यात येणार आहे. दुसरा प्रशिक्षण वर्ग या मतदार संघात ज्यांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक झाली त्यांच्या साठी दि.12 व 13 ऑक्टोबरला होणार आहे. ही निव,डणून पूर्णपणे मतदान यंत्रावर होणार असून प्रत्येक केंद्रावर व्हीव्ही पॅड राहणार आहे. एकूण 32 संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. वणी तालुक्यात 180 , मारेगाव तालुक्यात 74 व झरी तालुक्यात 69 मतदान केंद्र राहणार आहे. एकूण मतदारांपैकी 2 लाख 76 हजार 833 मतदाराजवळ निवडणूक ओळखपत्र आहेत. शक्यतो याच ओळखपत्राचा उपयोग मतदारांनी मतदानासाठी करावा असे आवाहन त्यांनी केले. नियमितपणे प्रत्येक निवडणुकीत ग्राह्य मानण्यात येत असलेले 11 पुरावे याही निवडणुकीत ग्राह्य धरण्यात येईल.

उमेदवारी अर्ज दि. 27 सप्टेंबर पासून 4 ऑक्टोबर पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. या अर्जाची छाननी 5 ऑक्टोबरला होणार असून 7 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. 21 ऑक्टोबरला मतदान झाल्या नंतर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून येथील उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे हे काम करणार आहेत.सहायक निवडणूक अधिकारी म्हणून वणीचे तहसीलदार श्याम धनमने, मारेगावचे तहसीलदार दीपक पुंडे, झरीचे तहसीलदार गिरीश जोशी हे काम करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.