जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार
वामनराव कासवारांच्या वाढदिवसाला कोंगरे यांचे आश्वासन
सुशील ओझा,झरी: वणी विधानसभेचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे व संचालक राजू येल्टीवार यांचा सत्कार झाला. हा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय मुकूटबन येथील सभागृहात झाला.
कार्यक्रमात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. त्यात तालुका अध्यक्ष आशीष खुलसंगे यांनी माजी आमदार वामनराव कासावार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
वणी विधानसभेत ८९ टक्के ग्रामपंचायत निवडून आल्या. त्या १०० टक्के निवडून आणू व तिन्ही तालुक्यात काँग्रेसचे नाव प्रथम स्थानी नेऊ, तसेच वीरभद्र पाटील यांनी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबरोबर अनेक गावात रस्ते नव्हते. इतर समस्या होत्या. ते निवडून आल्यावर मोठ्या प्रमाणात विकास केल्याचे सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी बँक ही शेतकऱ्यांची असल्याचे म्हटले. शेतकऱ्यांच्या बँकेबाबत प्रत्येक समस्या सोडविण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहो. शेतकऱ्यांना कोणतीही समस्या असो त्यांनी अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी त्यांच्या समस्या सोडविणार असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांना यानंतर कर्ज फेडण्याकरिता बँकेची कोणतीही नोटीस येणार नाही. तसेच साडे दहा टक्के व्याज आकारण्यात येणार नाही. पक्षश्रेष्ठींनी तसेच खासदार बाळू धानोरकर व वामनराव कासावार यांनी जी जवाबदारी माझ्या खांद्यावर टाकली, ती मी चांगल्या प्रकारे पार पाडेन असे आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात कासावार यांनी बाहेरगावातून असलेल्या सर्व पुढारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. अध्यक्ष टीकाराम कोंगरे व संचालक राजीव येल्टीवार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय देतील असेही म्हटले. सर्वांनी एकत्र राहून काम करण्याकरिता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी असमदार वामनराव कासावार होते. तर सत्कारमूर्ती टीकाराम कोंगरे, राजू येल्टीवार होते. प्रमुख उपस्थिती म्हणून रामन्ना येल्टीवार, प्रकाश कासावार, सूर्यतेज कासावार आशीष खुलसंगे, प्रवीण कासावार, प्रकाश म्याकलवार, संदीप बुरेवार, प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, गेडाम, राजू पाथरडकर ,भुमारेड्डी बाजनलावार, वीरभद्र पाटील, नासिमलु यासमवार, अरविंद भेंडोडकर, नीलेश येल्टीवार, सुनील ढाले, राजीव आस्वले, हरिदास गुर्जलवार होते.
सूत्रसंचालन प्रा. दिलीप अलोणे यांनी केले. तर आभार राजीव आस्वले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता राहुल दांडेकर, चेतन म्याकलवार, मनोज अडपावर व बाजार समितीचे सर्व कर्मचारी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
आझाद इलेक्ट्राॅनिक्सचा एसी बीग ब्लास्ट सेल AC Big Blast Sale