शाळेच्या आठवणींना उजाळा! 2002-03 बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात

शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांचे मनोगत आणि बालपणाच्या आठवणींचा सोहळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: श्री शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयातील इ. 10 वी (ब) 2002-03 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवारी, 26 ऑक्टोबर रोजी एकमेकांच्या भेटीचा आनंद साजरा करत स्नेहसंमेलनाचा भावनिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला. बालपणातील गमती-जमती, शाळेच्या आठवणी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनात रंगलेले हे संमेलन सर्वांना पुन्हा त्या निरागस दिवसांत घेऊन गेले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजुभाऊ मुकेवार होते. विद्यालयाचे प्राचार्य क्षीरसागर सर आणि सिंग मॅडम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या एकतेचे कौतुक करत समाजातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईशा ठाकुरवार यांनी तर प्रस्तावना मयुरी बदखल यांनी सादर केली. मनोगत सत्रात निता गौरकार बोधे, शीतल ढुमणे बोडेकर, प्रवीण नागतुरे, विश्वनाथ कामनवार आणि विजया तेजे सावरकर यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या. आभार प्रदर्शन धीरज आगुलवार यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संपूर्ण कार्यक्रम भावनिक आणि आनंददायी वातावरणात पार पडला. या स्नेहसंमेलनामुळे माजी विद्यार्थ्यांमध्ये जुन्या आठवणींचा पूल बांधला गेला. एकमेकांशी पुन्हा संवाद साधण्याची आणि विद्यालयाशी नाते दृढ करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत पुढील काळातही असेच उपक्रम नियमितपणे राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. या स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी बॅचमधील अनेक माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रदीप पहापळे, नरेंद्र केळकर, सतीश काकडे, प्रवीण नागतुरे, सचिन पडोळे, विश्वनाथ कामनवार, रोशन कटारिया, सुमेध बद्रे, धीरज आगुलवार, मयुरी बदखल, श्रीकांत पत्तीवार, प्रसाद चौधरी, विजया तेजे, पीयू जैस्वाल, सचिन झाडे, अतुल नागपूरकर, तिलोत्तमा किनकर, ईशा मेंढुले, प्रवीण पहापळे, विशू खत्री, विशाखा देवतळे, मिलिंद भगत, सोनाली बोढाले, रमेश झाडे, हेमंत देठे, धीरज बांगरे, बंडू धुळे, नितीन बिनगुले, रुपाली खंडाळकर, प्रियांका चिकटे, स्नेहा तुगनायत, कंचन चानना, स्वाती मुजारिया,

राहुल नागतुरे, गजानन झोडे, इसार खान पठाण, राहुल चव्हाण, सुषमा गिरसावडे, नीता गौरकार, रेणू क्षीरसागर, शीतल ढुमणे, प्रिया येरने, कल्पना हिरादेवे, मोहन थोटे, दीपा मोहबिया, सचिन चकोर, सचिन घोडमारे, भावना भटारकर, पल्लवी निमसटकर, स्नेहा निबरड आदींचा सहभाग उल्लेखनीय ठरला.

Comments are closed.