शिंदोला: वणी येथील आदर्श विद्यालयात इयत्ता 8 ,9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधन्याच्या दृष्टीने वाचन लेखन यासह विविध उपक्रम नुकतेच राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.एन. झाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सुरेश घोडमारे, वैजनाथ खडसे, मार्गदर्शक डी.आर. मोरे उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शक डी. आर. मोरे यांनी वाचन, लेखन, श्रवण, मनन, चिंतन, शुद्धलेखन, आरोग्य आणि व्यक्तीमत्व विकास अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. देशाचा विकास साधावयाचा असेल तर अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे विध्यार्थी घडविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वैजनाथ खडसे यांनी केले.
(हे पण वाचा: आदर्श विद्यालयात आनापान आणि विपश्यना साधना शिबिर)
याप्रसंगी सर्व शिक्षक आणि विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.