वणी-अडेगाव-मुकुटबन बस फेरी सुरु

मंगेश पाचभाईच्या पाठपुराव्याला यश

0
देव येवले, मुकुटबन: गेल्या तीन वर्षांपासून वणीवरून अडेगावला जाण्याकरिता बसफेरी उपलब्ध नव्हती. त्यामुळे सर्वसामान्यांना खासगी वाहनानं मुकुटबन आणि वणीला प्रवास करावा लागायचा. अडेगाववरून आणि मार्गावरील गावांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वणी आणि मुकुटबनला शिकण्यासाठी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही प्रवासासाठी अडचण येत होती. मात्र अखेर वणी-अडेगाव-मुकुटबन ही बससेवा शुक्रवार पासून सुरू करण्यात आली. त्यामुळे सर्वासामान्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
Podar School 2025

(खर्रा घेण्यावरून वाद, तरुणाचा मारहाणीत मृत्यू)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अडेगाव वरून मुकुटबन आणि वणीला बससेवा सुरु करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई हे सातत्यानं पाठपुरावा करत होते. त्यांनी वेळोवेळी वणी आगाराकडे याबाबत निवेदन सादर केली होती. अखेर आगार प्रमुखांनी त्याची दखल घेत वणी अडेगाव मुकुटबन ही बससेवा सुरू केली. शुक्रवारी या बसनं मुकुटबनकडे प्रस्थान केलं त्यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.