अखेर अण्णाभाऊ साठे चौकातील झुकलेल्या पोलचे काम सुरू

अंकुश बोढे यांच्या पाठपुराव्यानंतर दोन दिवसांतच पोल बदलण्याचे काम

बहुगुणी डेस्क, वणी: अण्णाभाऊ साठे चौकातील धोकादायक झुकलेल्या वीजपोलाबाबत दीर्घकाळानंतर अखेर महावितरण प्रशासनाला जाग आली आहे. मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी दिलेल्या निवेदनानंतर अवघ्या दोन दिवसांतच महावितरण विभागाने नवीन पोल बसवण्याचे काम सुरू केले. यामुळे स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करीत असून त्यांनी अंकुश बोढे व मनसेचे आभार मानले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

महाराष्ट्र बँकेजवळील पोल खालच्या भागातून सडल्याने झुकलेल्या अवस्थेत होता. परिसरातील नागरिकांनी याबाबत वेळोवेळी निवेदनं दिली होती; मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. अखेर मनसेच्या पुढाकाराने 7 ऑक्टोबर रोजी महावितरणच्या अभियंत्यांना सविस्तर निवेदन देण्यात आलं.

“वादळवाऱ्यामुळे हा पोल कोसळल्यास त्याची जबाबदारी महावितरणवरच येईल,” असा इशारा देण्यात आला होता. यानंतर केवळ दोन दिवसांतच महावितरणने अण्णाभाऊ साठे चौकात नवीन पोल बसवण्याचे काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक रहिवाशांनी मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचे आभार मानले असून, “दीर्घकाळ प्रलंबित असलेली समस्या अखेर सुटली,” अशी भावना व्यक्त केली.

Comments are closed.