वणी कृषी उत्पन्न बाजार समिती होणार ऑनलाइन

गुरुवारी झाला ऑनलाईन लिलाव

0

वणी: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम योजनेअंतर्गत महाराष्ट्रतील 305 बाजार समित्यापैकी 30 बाजार समिती ऑनलाईन होणार आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी बाजार समितीची निवड करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत 10 संगणक, टॅब, वेब कॅमेरा व इतर साधनसामग्री शासनाकडून मोफत देण्यात आली आहे.

Podar School 2025

आता शेतमालाचे खरेदी-विक्री व्यवहार सर्व ऑनलाईन होणार. यामध्ये 22 व्यापा-यांनी व 159 अडत्यांनी ई-पोर्टलवर नाव नोंदणी केली आहे. यापुढे गेट एन्ट्री, लॉट मॅनेजमेंट, शेतमालाची गुणवत्ता तपासणे, ई-लिलाव, शेतमालाचे वजन, विक्रीबिल, शेतकारांचे पेमेंट, अडत्यांचे पेमेंट, बाजार समितीचा सेस अशा सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. अशी माहिती बाजार समितीचे सचिव अशोक झाडे यांनी दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गुरुवारी झाला ऑनलाईन लिलाव
वणी बाजार समिती सज्ज झाल्यानंतर दिनांक 10 ऑगस्ट 2017 रोजी बाजार समितीच्या आवारात धाण्यमालाचा ई लिलाव गौतम वर्धन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये वणी तालुका साहाय्यक निबंधक बी जी जाधव हे अध्यक्ष स्थानी होते. सभापती संतोष कुचनकर व सदस्य प्रमोद वासकर, प्रमोद मिलमीले, सतीश बदघरे प्रेमानंद धानोरकर, नागेश काकडे, दयालाल अरके, सुलोचना कातकडे, विनायक एकरे, गणपत रासकर, महेश देठे, जीवन झाडे व इतर सदस्य कार्यक्रमात उपस्थित होते.

(वणीला सतराचा खतरा… 17 गुन्हेगारांना घेतलं ताब्यात)

कायक्रमाचे संचालन अशोक झाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष कुचनकर यांनी केलं. यावेळी शेतकरी ,व्यापारी,अडते ,हमाल व मापारी उपस्थित होते. आता बाजार समिती हायटेक झाल्याने याचा फायदा शेतकरी वर्गा सोबतच व्यापारी वर्गाला होईल व व्यहारात पारदर्शकता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.