वणी बार असोसिएशन निवडणुकीत एकता पॅनलचा दणदणीत विजय
ऍड. ज्ञानेश्वर कातकडे अध्यक्ष व ऍड. सुशील काळे सचिवपदी
जितेंद्र कोठारी, वणी: बार असोसिएशन वणीच्या निवडणुकीत एकता पॅनलने प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवीत सर्व 11 उमेदवार निवडून आणले. सन 2022 ते सन 2025 या 3 वर्षासाठी बार असोसिएशनची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऍड. ज्ञानेश्वर कातकडे तर सचिव पदावर ऍड. सुशील काळे यांची निवड झाली आहे.
मंगळवार दिनांक 25 फेब्रु. रोजी न्यायालय परिसरात निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत एकता पॅनल व परिवर्तन पॅनल हे दोन गट उभे होते. त्यापैकी एकता पॅनलचे 11 पैकी 11 उमदेवार निवडुन आले. अध्यक्ष पदाकरीता ऍड. ज्ञानेश्वर केशव कातकडे हे 56 मते घेवून निवडुन आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी ऍड. राहुल खापर्डे यांना 33 मते आणि ऍड. दादा ठाकुर यांना 4 मते मिळाली.
बार असोसिएशन उपाध्यक्ष पदाकरीता ऍड. विनोद दादाजी चोपणे हे 62 मते घेवुन निवडुण आले. तर ऍड. दिलीप परचाके यांना 31 मते मिळाली. सचिव पदाकरीता ऍड. सुशील गणपतराव काळे यांनी 54 मते घेवून प्रतिस्पर्धी ऍड. विप्लव तेलतुंबडेवर 15 मतांनी विजयी मिळविला. सहसचिव पदावर ऍड. जितकुमार शिवदास चालखुरे आणि कोषाध्यक्ष पदावर ऍड. प्रेमकुमार मधुकर घगडी यांची अविरोध निवड करण्यात आली.
ऍड. सुषमा गुणवंतराव क्षिरसागर, ऍड. सतिश नानाजी मेलावार, ऍड. सारिका भुजंग उमरे, ऍड. शुभम दिपक छाजेड, ऍड. निदा आफरिन शफी खान व ऍड. रूपेश मंगल पचारे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. बार असोसिएशन निवडणुकीत 95 अधिवक्त्यापैकी 93 अधिवक्त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन ऍड. मिलिंद निमजे आणि सहनिवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ऍड. यशवंत बरडे व ऍड. शेखर व-हाटे यांनी कामकाज सांभाळले.
Comments are closed.