शेतक-यांच्या विविध मागण्यांवर काँग्रेसचे निवेदन

वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठकीचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: वणी: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्याबाबत बुधवारी वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. याबाबत माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीला जिल्ह्यातून नेमलेले वणी ग्रामीणकरिता निरीक्षक विजय पाटील, गौरीशंकर खुराणा, वणी शहरसाठी अरविंद वाढोनकर, महादेव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

बैठकीत सहा ठराव मंजूर करण्यात आले. त्यात १२ जुलैला सरकारने विधिमंडळासमोर कॅगचा अहवाल मांडला, त्यातून राज्यसरकारच्या गलथान कारभाराचे आर्थिक बेशिस्तीचे भयाणवास्तव समोर आले. त्या बाबतीत सरकारने हिशेब द्यावा. तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, स्व.गोपीनाथ मुंडे विमा शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांना लागू करावा, अतिवृष्टीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान येत्या काही दिवसात काँग्रेसद्वारा काढण्यात येणा-या शेतकरी न्याय यात्रेसंबंधीची माहिती यावेळी देण्यात आली. निवेदन देताना सर्व निरीक्षक, माजी आमदार वामनराव कासावार, तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, शहराध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा, शहर कार्याध्यक्ष अशोक पांडे, डॉ. मोरेश्वर पावडे, टीकाराम कोंगरे, आशिष खुलसंगे, नरेंद्र ठाकरे, विवेक मांडवकर.

डॉ. भाऊराव कावडे, ओम ठाकूर, राजू कासावार, संजय खाडे, प्रशांत गोहोकार, उत्तम गेडाम, मंगल मडावी, राजेंद्र कोरडे, तालुका महिला अध्यक्ष सुरेखा लोडे, शहर महिला अध्यक्ष श्यामा तोटावार, शालिनी रासेकर, ओबीसी सेलचे विकेश पानघाटे, सेवादलचे प्रमोद लोणारे, काजल शेख, नवनियुक्त सर्व पदाधिकारी, तालुक्यातील व शहरातील सर्व कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.

Comments are closed.