भररस्त्यात दहशत! दोन युवकांवर लाठीने प्राणघातक हल्ला

चौपाटीवर बसलेल्या मित्रांवर हल्ला; हल्लेखोरावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: दीपक चौपाटी परिसरात भररस्त्यात दहशत निर्माण करणारी घटना घडली असून बारसमोर बसलेल्या दोन युवकांवर अचानक लाठीने हल्ला करण्यात आला. कोणतेही कारण नसताना झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

तक्रारीनुसार, रंगनाथ नगर येथील सुमित राज मानकर (वय 20) हा आपल्या मित्रासोबत 4 एप्रिल रोजी सायंकाळी दीपक चौपाटी परिसरातील एका बारसमोर चबुतऱ्यावर बसून गप्पा मारत होता. दरम्यान, भाग्यशाली नगर येथील गणेश उर्फ गुण्या बावणे (वय 30) हा तेथे आला. त्याने अचानक आक्रमक होत लाठीने सुमीत व त्याच्या मित्रावर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन्ही युवक जखमी झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर जखमींनी तत्काळ वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपी गणेश बावणे याच्याविरुद्ध रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments are closed.