रॉकवेल मिनरल्स येथे 27 जानेवारीला ईपीएफओ उपक्रम
ईपीएफओ अधिकाऱ्यांचा कर्मचा-यांशी थेट संवाद व तक्रार निवारण
बहुगुणी डेस्क, वणी: कामगार मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ई. पी. एफ. ओ.) यांच्या वतीने “निधी आपल्या निकट – विस्तार व बळकटीकरण” या महत्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रॉकवेल मिनरल्स भालर यांच्या वतीने हा कार्यक्रम मंगळवार, 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता, भालर रोडवरील रॉकवेल मिनरल्स सभागृहात पार पडणार आहे.
मुख्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात कामगार, नियोक्ता तसेच इतर हितधारकांशी ई. पी. एफ. ओ. अधिकाऱ्यांचा थेट संवाद साधला जाणार आहे. या संवादातून भविष्य निर्वाह निधीशी संबंधित विविध अडचणी, प्रलंबित तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात येणार असून, ई. पी. एफ. ओ. च्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
“निधी आपल्या निकट” या उपक्रमामुळे ई. पी. एफ. ओ. च्या सेवा अधिक लोकाभिमुख होणार आहेत. स्थानिक स्तरावरच नागरिकांच्या समस्या मार्गी लागण्यास मदत होणार असून, कामगार व नियोक्त्यांना थेट लाभ मिळणार आहे. या कार्यक्रमाद्वारे ई. पी. एफ. ओ. प्रशासनाने जनजागृतीसह सेवा विस्ताराचे उद्दिष्ट ठेवले आहे. कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ई. पी. एफ. ओ. प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच सूर्या सेमचे एच. आर. हेड हुसैन भाषा यांनीही उपस्थित राहून कामगार व नियोक्त्यांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या उपक्रमामुळे भविष्य निर्वाह निधीशी संबंधित तक्रारींचे निराकरण स्थानिक पातळीवर होणार असून, कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. वणीसारख्या औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारचे कार्यक्रम होणे ही सकारात्मक बाब मानली जात आहे.



Comments are closed.