संकटमोचन मंदिराजवळ दोन कुटुंबात मारहाण – 7 जणांवर गुन्हे

जुना वाद उफाळला, परस्पर विरोधात तक्रार दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील संकटमोचन हनुमान मंदिराजवळील परिसरात कुटुंबातील वादातून दोन कुटुंबात वाद झाला. वाद चिघळून मारहाण, शिवीगाळ आणि धमकीपर्यंत प्रकरण गेले असून दोन्ही बाजूंकडून परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी 7 जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही घटना रविवारी दिनांक 9 नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली.

पहिली तक्रार सपना देवनारायण जोशी (वय 40) यांनी दिली. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या कुटुंबाचा जेठ महेश रामगोपाल जोशी यांच्यासोबत दुकानाच्या हिस्स्यावरून दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. यापूर्वीही 2004 मध्ये झालेल्या वादाबाबत कोर्टात केस झाली होती व निकाल त्यांच्या बाजूने लागला. मात्र मागील काही वर्षांपासून महेश जोशी यांच्या सुना वारंवार वाद घालत असतात.

दिनांक 8 नोव्हेंबर रोजी असाच एक वाद झाला. त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पुन्हा वाद उफाळला. यावेळी महेश जोशी यांच्या सुनांनी सपना त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. त्यानंतर महेश यांचे मुलं तिथे आले त्यांनी सपना त्यांच्या पतीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. वाद सोडवण्यासाठी सपना मध्ये पडल्या असताना त्यांना देखील लाकडी दांड्याने मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच आरोपींनी फिर्यादीला धमकी देल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुसरी तक्रार सौ. पूजा राहुल जोशी (वय 26) यांनी दिली. तक्रारीनुसार, दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता पूजा जोशी यांनी शेजारी राहणारे देवनारायण रामगोपाल जोशी (सपना यांचे पती) यांना मंदिराच्या लहान गेटला लागून असलेली सलाक काढण्यास सांगितले. यावरून वाद निर्माण झाला. काही वेळाने देवनारायण जोशी यांनी वेल्डिंगवाल्याला बोलावून गेट काढण्याचा प्रयत्न केला असता पूजा यांनी त्याला थांबवले. यामुळे वाद तीव्र झाला. 

सायंकाळी देवनारायण जोशी लोखंडी रॉड घेऊन पुन्हा भांडणास आले. त्यांची पत्नी व मुलीने पूजा यांच्यावर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. असे तक्रारीत म्हटले आहे. पहिल्या तक्रारीनुसार चौघांविरोधात बीएनएसच्या कलम 115(2), 118(1), 3(5), 351(2), 351(3), 352 बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुस-या तक्रारीवरून तिघांवर 115(2), 3(5), 351(2), 351(3), 352 बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. प्रकरणाचा वणी पोलीस तपास करीत आहे.

Comments are closed.