वणी–कायर मार्गावर दोन दुचाकींची धडक

एक ठार तर तीन जखमी, एकाची परिस्थिती गंभीर

0

विवेक तोटेवार, वणी:  वणी ते कायर मार्गावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात एक ठार, एक गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना दि. २३ शुक्रवारी दुपारच्या सुमारास उमरी गावाजवळ घडली.

वणी तालुक्यातील कायर येथे कार्तिक पौर्णिमा निमित्त यात्रा भरते. ही यात्रा पाहून बंडा (वरझडी) येथील प्रमोद दिगांबर वासाडे वय २८, रामचंद्र दामोदर लेनगुळे वय ५० आणि जगदीश मारोती लोनबळे वय २८ हे तिघेजण क्रमांक नसलेल्या नवीन दुचाकीने गावाला परत येत होते. तर त्याचवेळी विठ्ठलवाडी वणी येथील विशाल नामदेव शेंडे वय २५ हा वणी वरून कायरकडे दुचाकी क्रमांक एम.एच. २९ ए एस ८३५० ने जात होता. दोन्ही गाडया अनियंत्रित होऊन समोरासमोर धडक झाली.

या घटनेत प्रमोद वासाडे याचा मृत्यू झाला. विशाल शेंडे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरला उपचारासाठी हलविण्यात आले. तर रामचंद्र लेनगुळे आणि जगदीश लोनबळे किरकोळ जखमी असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांच्यावर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. वणी पोलिस घटनेचा तपास करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.