वणीत भव्य सांस्कृतिक महोत्सव व उद्योगक महिला मेळावा

शुक्रवारी 13 मार्च रोजी एस.बी लॉन येथे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वणीत भव्य सांस्कृतिक महोत्सव तसेच उद्योगक महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 13 मार्च 2026 रोजी एस.बी. लॉन, वणी येथे हा कार्यक्रम होणार आहे. वणी नगरपालिकेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला वणी व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11.00 वाजता होणार. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून यवतमाळच्या नगराध्यक्ष अॅड. प्रियदर्शिनी उईके उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी नगर परिषदेच्या अध्यक्ष विद्या खेमराज आत्राम राहणार आहे. यासह कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत उद्योगक महिला गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन राहणार व विक्री राहणार आहे. 

सकाळी 11.30 वाजल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात सोलो डान्स, ग्रुप डान्स, नाटिका, भारूड, गोंधळ आदी कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. सायंकाळी 5.00 वाजता स्नेहभोजन तर सायंकाळी 5.30 वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रंगतदार मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती तसेच दीनदयाल जन आजीविका योजना (DJAY-S) CLF/CLC यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात वणी शहरातील महिला, बचत गट व उद्योजिका यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.