न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनच्या कार्यकारिणीची फेरनिवड
अध्यक्षपदी दिपक छाजेड, उपाध्यक्षपदी शेख इक्बाल, सचिवपदी परशुराम पोटे
पुरुषोत्तम नवघरे, वणी: न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनची बैठक साप्ताहिक मुक्त ललकार कार्यालयात उत्साहात पार पडली. बैठकीदरम्यान विद्यमान कार्यकारिणीचे कामकाज समाधानकारक व सुरळीत सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. सदस्यांनी सर्वानुमते जुन्याच कार्यकारिणीची फेरनिवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अध्यक्षपदी दिपक छाजेड, उपाध्यक्षपदी शेख इक्बाल तसेच सचिवपदी परशुराम पोटे यांची फेरनिवड करण्यात आली. बैठकीस माजी अध्यक्ष आसिफ शेख, महादेव दोडके, विशाल ठोंबरे, प्रविण शर्मा, दिपक छाजेड, परशुराम पोटे, इक्बाल शेख यांच्यासह असोसिएशनचे इतर सदस्य उपस्थित होते. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.


Comments are closed.