नृसिंह व्यायाम शाळेत कबड्डी खेळाडूंचा सत्कार

मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडूंचा गौरव सोहळा पार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील नृसिंह व्यायाम शाळा प्रणित नृसिंह स्पोर्टिंग क्लबच्या खेळाडूंचा सत्कार 4 डिसेंबर रोजी व्यायाम शाळेच्या प्रांगणात पार पडला. नुकत्याच भंडारा येथे झालेल्या राज्य कबड्डी स्पर्धेत गौरी श्रीराम पिदुरकर, श्रद्धा प्रेमराज देशमुख आणि जानवी प्रकाश ठाकरे या तिन्ही खेळाडूंची जिल्हा कबड्डी संघात निवड झाली होती. यापैकी गौरी श्रीराम पिदुरकर हिची विदर्भ संघात निवड झाली होती. 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान सोनिपत (हरियाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत गौरीने उल्लेखनीय कामगिरी केली. तिचा सत्कार उज्ज्वल गौरक्षण संस्थेचे सचिव सुधाकर काळे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या खेळाडूंना मदत करण्याची घोषणा केली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर व्यायाम शाळेचे सचिव पुरुषोत्तम आक्केवार, कोषाध्यक्ष रमेश उगले, सुर्यकांत मोरे गुरुजी, बंडू निंदेकर, विशाल ठोंबरे, दीपक देठे, प्रशिक्षक कुणाल ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Comments are closed.