दोन दिवस दुकान बंद; रात्री शटर उघडताच सिनेस्टाईल धाड

काळोखात प्लास्टिक पन्नीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न, 80 किलो माल जप्त

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुवारी वणीतील 3 एकल वापराच्या प्लास्टिक विक्रेत्यांच्या दुकानांवर नगरपरिषदेची धाड पडली आणि शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. कारवाईचा धसका घेत एका दुकानदाराने तब्बल दोन दिवस दुकान बंद ठेवले. मात्र शनिवारी रात्री उशिरा दुकानाचे शटर उघडले आणि प्रतिबंधित प्लास्टिक पन्नी व थर्माकोलच्या वस्तू जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पण हा डाव फार काळ लपून राहिला नाही… या हालचालींची खबर नगरपरिषदेला मिळताच पथकाने क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली. दुकान उघडताच धाड टाकून तब्बल 80 किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आली. या मालाची किंमत अंदाजे 1 ते 1.50 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

पालिकेची धाड पडताच शुक्रवारी अनेक प्रतिबंधक प्लास्टिक विक्रेत्यांनी आपले दुकान बंद ठेवले. शनिवारी बाजारपेठ बंद राहते. याचा फायदा घेऊन नगरपालिकेच्या समोर असलेल्या भाजीमंडी परिसरातील एका विक्रेत्याने घेण्याचे ठरवले. त्यांनी शनिवारी रात्री दुकानाचे शटर उघडले. दुकानातून प्रतिबंधित प्लास्टिक पन्नी दुकानातून बाहेर काढण्याचे ठरवले. त्यांनी दुकानातून माल काढण्यास सुरुवात केली. मात्र याची माहिती पालिकेच्या पथकाला मिळाली. पथकाने तातडीने दुकानावर धाड टाकली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या धाडीत पालिकेने ब्बल 80 किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आली. या मालाची किंमत अंदाजे 1 ते 1.50 लाख रुपये असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. सिंगल यूज प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दर महिन्याला विशेष तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऑगस्टनंतरही शहरातील विविध भागांत अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार का, याकडे नागरिक व व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

ही कारवाई मुख्याधिकारी, नगरपरिषद वणी यांच्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक विक्की करसे, ऋषिकेश वायदंडे, कर निरीक्षक किरण गडलिंग आणि मनीष तोमस्कर यांनी केली. नागरिक व व्यावसायिकांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा, तसेच प्लास्टिक बंदीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

Comments are closed.