ऑनलाईन तलवार मागवणे ठरले महागात: वणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पोस्ट ऑफिस कर्मचा-यांच्या तत्परतेमुळे प्रकार उघडकीस

विवेक तोटेवार, वणी: पंजाबमधून ऑनलाईन पद्धतीने धारदार शस्त्र (तलवार) मागविण्याचा प्रयत्न एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. वणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

23 डिसेंबर रोजी वणी पोस्ट ऑफिसमधील एका अधिकाऱ्याने ठाणेदार गोपाल उंबरकर यांना माहिती दिली की, एका व्यक्तीने ऑनलाईन माध्यमातून तलवार मागविली आहे. ही माहिती मिळताच ठाणेदारांनी डीबी प्रमुख धीरज गुन्हाने यांना तपासासाठी पाठविले.

पोलिसांनी चौकशीदरम्यान शिरपूर येथे जाऊन नरेंद्र महादेव केळकर (वय 35, रा. शिरपूर) याला ताब्यात घेतले. तो गावातच पानटपरी चालवतो. चौकशीत त्याने तलवार ऑनलाईन मागविल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला वणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मागविलेली तलवार पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलिसांकडून सुरू आहे.

Comments are closed.