प्रेस वेलफेअरच्या अध्यक्षपदी अनिल बिलोरिया तर सागर बोढे सचिव

प्रेस वेलफेअर असोसिएशनची नवी कार्यकारणी जाहीर

विवेक तोटेवार, वणी: येथील प्रेस वेलफेअर असोसिएशनची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी अनिल बिलोरिया तर सचिवपदी सागर बोढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नगर वाचनालयात आयोजित बैठकीत कार्यकारणीची निवड प्रक्रिया पार पडली. या वेळी उपाध्यक्षपदी रमेश तांबे, सहसचिवपदी जितेंद्र डाबरे, कोषाध्यक्षपदी तुषार अतकारे यांची निवड झाली. कार्यकारणी सदस्य म्हणून गजानन कासावर, विनोद ताजने, रवी बेलूरकर, डॉ. किशोर चवणे, मंगल तेलंग व असिफ शेख यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक नवले यांनी काम पाहिले.

Comments are closed.